loader image
[ays_poll id=7]

मनमाड रेल्वे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनचे कपलींग तुटल्याने अर्धी गाडी पुढे तर अर्धी गाडी मागे राहिल्याचा प्रका

Dec 30, 2022

मनमाड :- जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीच्या आरक्षित बोगी ची कपलिंग तुटल्याची घटना गुरुवारी सकाळी मनमाड जंक्शन स्थानकावर घडली. गाडी मनमाड स्थानकावर असतानाच सर्व प्रकार घडला वेळीच हा सर्व प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला मात्र या सगळ्या धावपळीत जनशताब्दी एक्सप्रेस ला सव्वा दोन तास उशीर झाला यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला
याबाबत सविस्तर माहिती अशी की जालन्यावरून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकावर आपल्या नियोजित वेळेवर आली त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना होत असताना गाडीच्या आरक्षित बोगी क्रमांक डी इलेव्हन बोगीच्या कपलिंग बेरिंग खराब झाल्यामुळे गाडी काही बोगी सोडून थोड्या अंतरावर गेली

मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली मात्र हाच प्रकार चालू गाडीत झाला असता तर मोठा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती दैव बलतवर म्हणून सदर घटना टळली रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर कार्य हातात घेत या गाडीची खराब झालेली डी इलेव्हन हे बोगी कट करून त्या जागी दुसरी बोगी लावण्यात आली यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली या सगळ्या गडबडीत मात्र जालन्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला गाडी तब्बल सव्वा दोन तास उशिराने मुंबईच्या दिशेने रवाना झाली

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.