loader image
[ays_poll id=7]

महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात विरोधात महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार दाखल

Dec 30, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात ऑक्टोबर २०१९ मध्ये अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा म्हणून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेवून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई ची रक्कम नांदगाव तहसीलदार यांच्या खात्यात वर्ग केली.मात्र तीन वर्ष उलटूनही महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान झालेल्या जळगाव खुर्द येथील २६१ शेतकर्‍यांना मात्र नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले.यासंदर्भात वारंवार विनंती अर्ज व पुरावे सादर करूनही महसूल प्रशासन दाद देत नसल्याने जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी वंचित २६१ शेतकऱ्यांसह नांदगाव येथील तहसीलदार यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण केले मात्र जिल्हाधिकारी कार्यालायाकडून मागणी केलेले अनुदान मिळणेबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी,प्रशासनाची झालेली अडचण लक्षात घेता सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित करणेबाबत नांदगाव येथील तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केलेल्या विनंतीवर वंचित शेतकऱ्यांच्या बैठकीत चर्चा केली असता नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालक्यातील जळगाव खुर्द शिवारातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान होऊनही शासकीय मदत न मिळालेले वंचित शेतकरी यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तसेच त्यानंतर जळगाव खुर्द येथील बसस्थानक येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ जे वर रास्ता रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करूनही महसूल प्रशासन जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देत नसल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघाचे नांदगाव तालुकाध्यक्ष तथा जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
.