loader image
[ays_poll id=7]

भारतीय खाद्य निगम मनमाडच्या गोदामात कारभाराची ऐशीतैशी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांकडून कानउघाडणी

Jan 4, 2023

मनमाड शहरात भारतीय खाद्य निगम,अन्न महामंडळाचे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे गोदाम असून येथून राज्यातील इतर भागात गहू, तांदूळ धान्य सरकारी धान्य दुकानात पाठवले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक सरकारी दुकानांमध्ये धान्य पोहचत नसल्याची तक्रार आल्याने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी एफसीआय मध्ये पाहणी दौरा करत पाहणी केली. एफसीआयच्या प्रबंधक असलेल्या मनीषा मीना यांना एफसीआय मध्ये असलेल्या गहू, तांदळाचा प्रत्येक महिन्याचा किती साठा उपलब्ध आहे किती वितरण केले गेले यासह इतर माहिती विचारली असता मीना यांना माहिती देता आली नसल्याने मंत्री डॉ पवार यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. जानेवारी ते डिसेंबरचा साठा, पुरवठा किती. वाटप कसे केले जाते याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांना कोणतेच समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच धान्य मोजले जाणारा वजनकाटा बंद आहे. एकच काट्यावर काम सुरू असल्याचे दिसून आले. येथून रोज शंभर ट्रक धान्य भरून पाठवले जात आहे. तसेच एफसीआय मध्ये असलेल्या गोदामाची पाहणी केली असता अस्वच्छता दिसून आल्याने मंत्री डॉ पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे शहराध्यक्ष जय फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, डॉ सागर कोल्हे, संदीप नरवडे, एकनाथ बोडके, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर धिवर, कैलास अहिरे, बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष मयूर बोरसे यासह इतर पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच एफसीआयचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एफ सी आय मध्ये कार्यरत असलेल्या विविध कामगार संघटनांनी कामगारांच्या समस्येबाबत मंत्री डॉ पवार यांना निवेदन देत आपले गाऱ्हाणे मांडले.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.