loader image
[ays_poll id=7]

ऊर्जामंत्र्यांची मध्यस्थी सफल – वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

Jan 4, 2023

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. आज उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३२ संघटनांशी चर्चा केली, त्यानंतर कर्मचारी संघटना प्रतिनिधी संजय ठाकूर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. दरम्यान, संप मागे घेतल्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळून वीज पुरवठाही सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अदाणी वीज कंपनीने महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना देण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. अदाणी कंपनीला वीज वितरण परवाना मिळण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, याला वीज कर्मचाऱ्यांच्या विरोध होत आहे. कामगार संघटनांशी सरकारने चर्चा केली, मात्र चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या होत्या. यासह इतर काही मागण्याबाबत वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. यावेळी फडणवीस म्हणाले, ३२ संघटनांशी तीन ते चार मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही संघटना होती. राज्य सरकारला कोणत्याही कंपन्यांचे खासगीकरण करायचे नाही. याउलटं पुढील ३ वर्षांमध्ये वीज कंपन्यांमध्ये सरकार ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक व्यवस्था उभी करण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.

समांतर परवान्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महावितरण आणि सरकारने हे अर्ज वीज नियामक आयोगाकडे करायला हवेत अशी भूमिका वीज कर्मचारी संघटनांनी मांडली. राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसंच कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम :

दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा मोठा परिणाम राज्यात जाणून आला. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान महावितरणसमोर उभं ठाकलं होतं. कामगार संघटनांनी बेकायदा संप सुरू न ठेवता तो त्वरित मागे घ्यावा. संप करणाऱ्यांवर मेस्मा कायदा लागगू करण्याची वेळ आणू नये, असा इशारा महावितरण आणि राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला होता.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड - दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते...

read more
चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

      दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

चांदवड - हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.  मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी  उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....

read more
.