नांदगाव ( प्रतिनिधी) येथील सिध्दी प्रकाशन मनमाडने प्रकाशित केलेले प्रा. सुरेश नारायणे यांच्या काव्यझुला या काव्यसंग्रहाला नवीन वर्षात पहिलाच स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार जाहीर झाला आहे. गिरणागौरव प्रतिष्ठान तर्फे गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यातील काव्यसंग्रहाना सन्मानित करण्यात येते. या वर्षी देखील गिरणागौरव प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कारासाठी काव्यझुला या काव्यसंग्रहाची स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कारासाठी निवड केली असुन तो पुरस्कार १५ जानेवारी रोजी कमलाकर आबा देसले साहित्य नगरी भावबंधन मंगल कार्यालय नाशिक येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानाने वितरण होणार असल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

राशी भविष्य : ९ मे २०२५ – शुक्रवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...