loader image

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे धार्मिक कार्यक्रम

Jan 21, 2023


वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी) माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे 27 व्या वर्षी यंदाही बुधवार दिनांक 25/01/ 2023 रोजी आयोजन मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो आम्हीं संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवत श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे अखंडितपणे 27 व्या वर्षी यंदा ही बुधवार दिनांक 25/01/ 2023 रोजी श्री गणेश जयंती {माघी चतुर्थी }(तिलकुंदचतुर्थी) निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्ताने खालील धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. धार्मिक कार्यक्रम सकाळी श्री निलमणी महागणेशास सकाळी ठी. 6-00 वाजता महाभिषेक महापूजा, सकाळी ठी 9-30 वाजता श्री सत्यविनायक महापूजा रात्री ठी.8-00 महाआरती व महाप्रसाद वाटप ( अन्नपूर्णा महासेवा) या धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे.. कोरोना चे संकट अजूनही सुरूच आहे सर्व श्रीगणेश भक्तांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करावे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...

read more
.