loader image
[ays_poll id=7]

माध्यम क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला सिद्ध आणि सक्षम होण्याची गरज – मुग्धा सराफ यांचे पत्रकार गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन

Jan 23, 2023


मनमाड ता  २३ –  माध्यम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने आज या क्षेत्रामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.  मात्र या स्पर्धेच्या काळातही स्वतःचा वेगळेपण निष्पक्षपुणे काम करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना स्वतःला सिद्ध आणि सक्षम करावा लागणार असल्याचे प्रतिपादन झी २४ तास  वृत्तवाहिनीच्या निवेदिका मधुरा सराफ यांनी येथे केले.

पत्रकार दिनानिमित्त नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे पल्लवी मंगल कार्यालयात पत्रकार गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.  अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार भास्कर कदम होते.  पत्रकारांच्या कुटुंबीयांसह तालुक्यातील पत्रकार  उपस्थित होते.  त्यामुळे हा कौटुंबिक सोहळा अधिक आनंददायी झाला.  मधुरा शराफ यांचेसह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पत्र महर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंचावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम, अशोक परदेशी, नरेश गुजराती, जगन्नाथ पाटील, मारुती जगधने, सतिष शेकदार, जहूर खान उपस्थित होते. तालुकाध्यक्ष अमोल खरे यांनी प्रास्ताविकात पत्रकार संघाच्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. साप्ता. मनमाड ठिणगीचे संस्थापक संपादक, जेष्ठ पत्रकार (स्व.) प्रकाशजी गोयल यांच्या स्मरणार्थ ठिणगी  परिवाराच्या वतीने दिल्या जाणारा जीवनगौरव  पुरस्कार जेष्ठ पत्रकार भास्कर कदम,  नरेश गुजराथी,    अशोक परदेशी, मारुती जगधने, जगनराव पाटील, सतीश शेकदार यांना प्रदान करण्यात आला. तर
जनश्रद्धा वृत्तपत्रातर्फे संस्थापक संपादक (स्व) कांतीलाल गुजराथी व ज्येष्ठ पत्रकार शकुंतला गुजराथी यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट बातमी पुरस्कार – नरहरी उंबरे (पुण्यनगरी), उत्कृष्ट वृत्तवाहिनी वृत्तांकन पुरस्कार
संदीप जेजुरकर (लोकशाही न्यूज), शोध पत्रकारिता पुरस्कार अशोक बिदरी (लोकमत) उत्कृष्ट न्यूज पोर्टल पुरस्कार दिपाली खरे (संपादक, मराठी मेट्रो), उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार योगेश म्हस्के(महाराष्ट्र टाईम्स),
समस्या प्रधान बातमी पुरस्कार सोमनाथ घोंगाने (दिनकर), उत्कृष्ट बातमीपत्र पुरस्कार अनिल आव्हाड (सकाळ), विशेष लेखन पुरस्कार निखिल मोरे (दि नाशिक हेराल्ड), उत्कृष्ट युट्युब चॅनल पुरस्कार नाना आहिरे (आवाज एन न्यूज), उत्कृष्ट वृत्तवाहिनी शोध पत्रकारिता पुरस्कार निलेश वाघ (झी २४ तास), उल्लेखनीय बातमी पुरस्कार रुपाली केदारे (पोलीस वार्ता), विशेष उल्लेखनीय बातमी पुरस्कार तुषार गोयल (मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल), उत्कृष्ट कार्यरत साप्ताहिक पुरस्कार उपाली परदेशी (साप्ता. पत्रीसरकार, मनमाड) यांना प्रदान करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा.  सुरेश नारायणे, स्वाती गुजराती, उपाली परदेशी यांनी केले. सरचिटणीस संदीप जेजुरकर यांनी आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद...

read more
नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण...

read more
भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

दिल्ली ता. 13 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची...

read more
नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली...

read more
.