नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ वय १५ इयत्ता नववी हिचे दि २६ जानेवारी रोजी शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सालाबाद प्रमाणे येथील ग्रामपालिकेच्या ध्वजारोहणासाठी जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान ” वंदे मातरम भारत माता की जय ” या घोषणा देत असताना चक्कर येऊन पडल्याने तिला उपचारासाठी तात्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. पुजा हिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी सांगितले. कु पुजास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. नांदगाव ला जात असताना च पूजा चे निधन झाले. याबाबत पुजा हिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तीला जन्मापासूनच श्वासोस्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिची तपासणी केली असता तिच्या फुफुसाला होल असल्याचे सांगितले होते, त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. परंतु तिचे शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली, तीच्यावर शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत १२ वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात त्यातून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असलेले सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम वरील घटनेमुळे रद्द करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

फलक रेखाटन दि.६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी
भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२...