loader image

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक – तांबे की पाटील उद्या होणार मतदान

Jan 29, 2023


राज्यात बहुचर्चित असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील ५ जागांवरील निवडणुकांसाठीचा प्रचार काल शनिवार, २८ जानेवारी रोजी संपला असून आता ३० जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानावर सर्वांच्याच नजरा लागून आहे. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी सगळ्याच पक्षांनी जोर लावला आहे. निवडणुकीदरम्यान दारूविक्रीवर घातलेली बंदी केवळ निवडणुकीच्या दिवशी म्हणजे ३० जानेवारीलाच असणार आहे. तर मतमोजणीच्या दिवशीही दारुविक्री सुरु राहणार आह

नाशिक पदवीधर मतदारसंघात एकूण २२ उमेदवार रिंगणामध्ये असले तरी अपक्ष सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात चुरस आहे. अपक्ष सत्यजीत तांबे यांना सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मिळत असलेला पाठिंबा आणि काल सोशल मीडिया मार्फत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यां मार्फत होणारा तांबेंचा प्रचार बघता सध्या तरी तांबे यांचे पारडे जड दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.शुभांगी पाटील यांना निवडून आणण्याचा चंग माहविकास आघाडीतील घटक पक्षांनी बांधला असून शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. नुकतेच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटात सामील होत शिवबंधन बांधणारे मालेगावचे युवा नेते यांनीही आपली सगळी ताकद आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या मागे उभी केली असून पदवीधर मतदारांच्या प्रश्नांना बगल देत ही निवडणूक एक प्रकारे राजकीय आखाडाच बनल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.