loader image
[ays_poll id=7]

सौ. ज्योती गणेश सानप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Jan 30, 2023


मनमाडच्या रहिवासी व सध्या नासिक येथील नर्गिस दत्त विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. ज्योती गणेश सानप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिले जाणारे जिल्हास्तरीय जीवनगौरव व गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यंदा पुरस्काराचे दहावे वर्ष असून मार्च महिन्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय कंरजकर, शहरप्रमुख विक्रम सोनवणे,संयोजक संग्राम करंजकर, निवड समिती अध्यक्ष के. के. आहिरे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये सौ. ज्योती सानप यांना स्काऊट विभागातून गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ. ज्योती सानप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आदिवासी विकास समिती व महात्मा गांधी विद्यामंदीरच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य त्यांना लाभले.
सौ. ज्योती सानप या मनमाडचे ज्येष्ठ सामाजिक व क्रीडा कार्यकर्ते कै. जयरामबाबा सानप यांच्या स्नुषा आहेत तर समाजिक कार्यकर्ते गणेश सानप यांच्या पत्नी आहेत.
भारत स्काऊट गाईड अंतर्गत नुकत्याच झालेल्या १८ व्या राष्ट्रीय स्तरावरील जांबोरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने तयार केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवेशद्वाराने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. आंतरराष्ट्रीय चित्रकार सावंत सर यांच्या टीममध्ये जिल्ह्यातील इतर कलाशिक्षकांसमवेत सौ. ज्योती सानप यांनी सहभाग दिला होता.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.