loader image

जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार

Jan 30, 2023


नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन चे पदाधिकारी यांनी आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार केला. मागील हप्त्यात मनमाड शहरात आमदार कबड्डी चषक भरविण्यात आला व या स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळाला. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या स्पर्धेसाठी 5 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या स्पर्धेचे उत्तम नियोजन शक्य झाले आणि मोठ्या प्रमाणात या स्पर्धा पार पडल्या, या नंतर आमदारांच्या व्यस्त नियोजनामुळे भेट होऊ शकली नव्हती म्हणून शनिवार रोजी संपर्क कार्यालय येथे कबड्डी असोसिएशन चे सर्व पदाधिकारी यांनी आमदारांची भेट घेतली. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाहक मोहन गायकवाड, सतीश सूर्यवंशी, अशोक गरुड, वाल्मीक बागुल, राजेश निकुंभ, महेंद्र वाघ यांनी या वेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत आमदारांचे आभार व्यक्त करत सत्कार केला.
या प्रसंगी आमदारांनी लवकरच मनमाड स्टेडियम दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 5 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून त्याचे भूमिपूजन करण्यात येणार आसल्याचे सांगितले, या मुळे मनमाड शहरातील सर्व क्रीडा प्रेमींना सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांची गैरसोय दूर होईल अशी माहिती दिली.
या प्रसंगी तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे,राजाभाऊ भाबड, वाल्मीक आंधळे, लाला नागरे, सादिक तांबोळी, दिनेश घुगे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.