loader image
[ays_poll id=7]

शिवसेना मनमाड शहर आयोजित निसर्गोपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Feb 2, 2023

हिंदूहृदयसम्राट, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने बुधवार दि.०१/०२/२०२३ रोजी श्रीयश परिपुर्ण निसर्गोपचार केंद्राचे प्रमुख जगविख्यात निसर्गोपचार तज्ञ डॉ. श्रीराम डी. कुलकर्णी (एन. डी / ए.एम.डी.) यांच्या उपस्थितीत मनमाडकरांसाठी भव्य निसर्गोपचार शिबीराचे आयोजन शहरातील श्री सप्तश्रृंगी निवासनी मंदिर येथे करण्यात आले होते.सदर शिबीरामध्ये १४० पेक्षा जास्त नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सदर शिबीराचे आयोजनात चंद्रकांत (पप्पु ) परब व सौ. वंदनाताई चंद्रकांत परब यांचे विशेष योगदान होते.

या शिबीराचे उद्घाटन नांदगाव तालुक्याचे मा. आमदार सर्वश्री जगन्नाथराव धात्रक, राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जेष्ठ उद्योगपती गुरुदिप कांत, हातिम गेटबोहरी, सहसंपर्क प्रमुख प्रविण नाईक, संजय कटारिया,शिवसेना जिल्हाउपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख श्री. माधव शेलार, विधानसभा संघटक संतोष जगताप, अशोक पद्मर, प्रविण सुर्यवंशी, बाळा सनासे, सुनिल देवकर, जिल्हा उपसंघटक कैलास भाबड, युवा उपजिल्हाधिकारी भैय्या घुगे, तालुका युवा अधिकारी सन्नी फसाटे, युवा सेना शहरप्रमुख इरफान शेख, योगेश शर्मा, किशोर कदम, एकनाथ बोडखे, महेश बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक गोगड, राष्ट्रवादीचे नेते हबीबभाई शेख, आनंद बोथरा, स्वराज देशमुख, कचरु आव्हाड, परेश राऊत, पंडीत सानप, दिलीप सोळसे, खालीद शेख, सुरेशशेठ शिंदे, चंद्रकांत गोगड, मजिद शेख, मोतीराम पगार, आनंद औटी, रतन दखने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सिध्देश परब, अभिषेक पितृभक्त, ऋतिक चव्हाण, अंकुश वानखेडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवसेना शहर सचिव जावेद मन्सुरी यांनी केले तर पप्पुशेठ परब यांनी आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.