गेल्या चार दशकांपासून रखडलेला मनमाडचा पाणीप्रश्न अखेर मिटणार असून मनमाडवरचा पाणीटंचाईचा कलंक पुसला जाणार आहे हा ऐतिहासिक क्षण १३ फेब्रुवारी रोजी आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३११ कोटींच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि एमआयडीसीची ऐतिहासिक घोषणा होणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयुर बोरसे, महिला शहरप्रमुख विद्या जगताप, संगीता बागुल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, मनमाड शहराचा पाणीप्रश्न गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेला होता. अनेकांनी प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. नांदगांव तालुक्याचा आमदार म्हणून माझी जबाबदारी असल्याने मी मनमाड शहराचा पाणीप्रश्न मिटावा यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आले असून मनमाडसाठी जीवनदायिनी असलेली करंजवन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जात असल्याचा आनंद आहे. या योजनेचा ऐतिहासिक सोहळा १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. येथील महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलावर त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ऐतिहासिक योजनेचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला उद्योग बंधारे व खनीकर्म तथा पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, बाळासाहेबांची शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी, खा. डॉ श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहे. अगदी भव्य दिव्य असा हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. मनमाडच्या नागरिकांनी या सुवर्ण सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मनमाड हे कामगार वस्तीचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी या शहरासह नांदगांव तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली असल्याने तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी मनमाड जवळ अनकवाडे, सटाणे शिवारात तब्बल ६७२ एकरांवर एमआयडीसी उभारण्यात येणार असून त्याची ऐतिहासिक घोषणा होणार आहे. ही एमआयडीसी उभी राहिल्यास मनमाड शहरासह नांदगांव, चांदवड, येवल्यातील तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होईल असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
बाळासाहेबांची शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी, खा. डॉ श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहे. अगदी भव्य दिव्य असा हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. मनमाडच्या नागरिकांनी या सुवर्ण सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
* नांदगांव शहरातील २५ कोटींचे भव्य दिव्य शिवसृष्टीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अद्यावत २ फिरते दवाखाने
★ शासकीय दाखले उपलब्ध करून देणारे २ फिरते शासकीय कार्यालये
★ नागरिकांसाठी मोफत २ जेसीबी
★ दिव्यांग बांधवांसाठी उपयोगी साधने
★ करंजवन योजनेच्या पाहणीसाठी मोफत बससेवा
★ ५ कोटींचे स्विमिंग टँक
★ ३ लाख लोकांना मोफत चष्मे वाटप
★ ट्रामा केअर सेंटर उभारणार
३११ कोटींच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मनमाड शहरातील सव्वा लाख जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होत असल्याचे समाधान आहे. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे
– आमदार सुहास कांदे











