loader image
[ays_poll id=7]

मै भी डिजिटल 4.0 मोहिमेअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत : शहरात कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार – आमदार कांदे

Feb 10, 2023

दि.09/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे, नांदगाव विधानसभा मतदार संघ, यांचे अध्यक्षतेखाली आणि डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक मनमाड नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड नगरपरिषद मार्फत राबवल्या जाणार्‍या केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) प्रधान मंत्री आत्मनिर्भर निधि (PM-SVANidhi), प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) अशा विविध प्रकारच्या लाभाच्या योजना मनमाड शहरातील गरीब व गरजू सुशिक्षित बेरोजगार लाभार्थ्यांना मनमाड नगरपरिषद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मनमाड यांचे सयुक्त विद्यमाने ‘मै भी डिजिटल 4.0’ या प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत 200 पेक्षा जास्त पथविक्रेते आणि काही स्वयंरोजगार कर्ज वितरित केलेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी मा. आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे, डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपरिषद, यांचे हस्ते श्री. विकास कुलकर्णी, व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मार्फत 20 पथविक्रेते यांना प्रत्येकी 10000/- आणि स्वयंरोजगार वैयक्तिक कर्ज घटकाअंतर्गत 8 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 2 लक्ष कर्ज व 2 लाभार्थयाना रिक्शा वितरित करण्यात आले तर श्री. अनिरुद्ध भालेराव, व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मनमाडचे मार्फत 08 पथविक्रेते यांना प्रत्येकी 10000/- आणि स्वयंरोजगार वैयक्तिक कर्ज घटकाअंतर्गत 05 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 2 लक्ष कर्ज वितरित करण्यात आले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना श्री संदीप आगोणे, शहर व्यवस्थापक, मनमाड नगरपरिषद यांनी केली, तर शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सौ. अंजुंमताई कांदे यांनी महिलांच्या शास्वत रोजगाराविषयी मार्गदर्शन केले. माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख श्री. मयूर बोरसे यांनी शहारच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी सध्या कार्यान्वित असणारी करंजवन पाणीपुरवठा योजना बाबत माहिती दिली. शिवसेना तालुका प्रमुख श्री. साईनाथ गिडगे यांनी मनमाड शहरात लवकरच MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत उद्योग व्यवसाय सुरू होणार असल्याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा संसाधव व्यक्ति श्रीमती सीमा वानखेडे यांनी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) याबाबत माहिती दिली. डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपरिषद यांनी नगरपालिका मार्फत राबण्यात येणार्‍या सर्व लाभाच्या योजना आणि शहारच्या सर्वांगीण विकास प्रणालीबाबत माहिती दिली. शेवटी अध्यक्षीय भाषणात मा. आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे साहेब, यांनी शहारच्या रोजगाराच्या शास्वत योजना आणण्याची घोषणा केली. मनमाड शहरात भव्य कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारून त्यातून महिलाना प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणार असल्याचे आश्वासन दिले. महिला बचत गटांना उत्पादित मालास स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून दिले जाईल असे संगितले.
कार्यक्रमाचे आभार सौ. रेखा गांगुर्डे, समूह साधन व्यक्ति, न.प. मनमाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.अशोक पाईक, कार्यालय अधीक्षक, न.प. मनमाड, श्री ज्ञांनेश्वर जाधव, कृषि कर्ज, एसबीआय बँक, योजनेचे समुदाय संघटक श्रीवर्धन कुशारे, अर्चना आव्हाड, शिवसेना उप प्रमुख श्री सुनील भाऊ हांडगे शिवसेना संघटक, श्रीम.विद्या जगताप आणि श्रीम. संगीता बागूल , शिवसेना शहर अधिकारी योगेश इमले व आसिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलावर शेख आणि श्री. मीर अहेमद यांनी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
.