loader image
[ays_poll id=7]

मनमाड बार अससिएशनच्या अध्यक्षपदी ऍड.किशोर सोनवणे तर खजिनदार पदी ऍड. संजय गांधी

Feb 10, 2023


मनमाड : येथील मनमाड कोर्टाच्या बार रूम मध्ये गुरुवारी मनमाड बार असोसिएशनची निवडणुक होवून त्यात प्रसिद्ध ज्येष्ठ वकील किशोर एकनाथ सोनवणे यांची ४५ पैकी ३१ मते मिळवून बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत बार असोसिएशनच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४५ सदस्यांनी मतदान केले.
सचिवपदी ॲड. शशिकांत माधवराव व्यवहारे यांना २३ मते मिळाल्याने यांची बहुमताने निवड जाहिर करण्यात आली. सहसचिव पदी ॲड.मुरलीधर गणेश बापट यांना २६ मते मिळाल्याने त्यांची निवड झाली. खजिनदार पदासाठी झालेल्या मतदानात ॲड. संजय शांतीलाल गांधी व ॲड. वाल्मीक सुखदेव जगताप या दोघांनाही समसमान २२ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून ॲड. संजय गांधी यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष पदासाठी ॲडव.सुरेश पी. पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. वळवी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव. अशोक लाठे यांनी काम पाहिले. नुतन कार्यकारिणीचे शहरांतील सर्व थरांतील नागरीकांनी अभिनंदन होत आहे. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन


अजून बातम्या वाचा..

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

नांदगाव -(सोमनाथ घोंगाने) अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने  दुष्काळ सदृष्य मंडळांना...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
.