loader image

अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता घराच्या प्रांगणातील खड्ड्यात दफन करून केली वृक्ष लागवड – मनमाडच्या केदारे कुटुंबीयांनी घालून दिला आदर्श

Feb 11, 2023


मनमाड – पिताच्या मृत्यूनंतर अस्थी व रक्षा नदीत विसर्जित करण्याच्या प्रथेला फाटा देत मनमाडच्या बुधलवाडी भागातही केदारे कुटुंबियांनी घराजवळ खड्डा करून अस्थी व रक्षा दफन करत त्याच ठिकाणी वृक्ष लावून पिताच्या आठवणी कायमच्या जतन करत समाजापुढे आदर्श घालून दिला.
मनमाडच्या बुधलवाडी भागात राहणारे काळू दगाजी केदारे यांचे 88 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,सहा मुले , सुना ,नातवंडे व पणतू असा मोठा परिवार आहे. त्यापैकी अरुण केदारे व राजू केदारे हे परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत असून वडिलांचे निधन झाले.निधनानंतर आपल्याकडे अस्थी विसर्जन करण्याची प्रथा आहे.मात्र त्यामुळे जल प्रदूषण होते.हा प्रथेला फाटा देत त्यांनी वडिलांच्या अस्थी विसर्जित न करता घराजवळच खड्डा करून अस्थी खड्ड्यात दफन करून त्यांच्या स्मृतीनिमित्त वृक्ष लागवड करण्याची संकल्पना मांडली त्यास कुटुंबातील सदस्यांनी सहमती दर्शविली.
जलदान व पुण्यामोदन कार्यक्रमाच्या दिवशी घराच्या प्रांगणात सर्व आप्तेष्टांच्या उपस्थित घराजवळ खड्डा करून दिवंगत काळू केदारे यांच्या अस्थी दफन करून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून वडिलांच्या स्मृती जपल्या ..पाण्यात अस्थी विसर्जन केल्याने पाण्याचे प्रदूषण होते.तो रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर वृक्ष लागवड केल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.झाडापासून ऑक्सिजन मिळते व निसर्गचक्रही अबाधित राहते.आणि झाडापासून फळे व फुले मिळत असल्याने वडील कायम स्मरणात राहतील…


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
.