loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – सोशल मीडियावर सध्या एका झेलचीच चर्चा – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घेतली दखल

Feb 14, 2023

सोशल मीडियावर सध्या एका झेलची चर्चा होत आहे. सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही या झेलची भूरळ पडली आहे.
व्हिडीओ पाहून तो फलंदाज बाद आहे की नाही, याचा अंदाज लावणे कुणालाही अवघड आहे. सचिन तेंडुलकर, मायकल वॉन आणि जिम्मी निशम यांनी हा व्हिडिओ शेअर करुन झेलचे कौतुक केले. हा झेल बेळगावमधील टिळकवाडी येथे झालेल्या एका लोकल स्पर्धेतील आहे. हा लोकल व्हिडीओतील तरुण आता जगभरात प्रसिद्ध झालाय. त्या तरुणाचं नाव किरण तरळेकर असे आहे.

बेळगावातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर सध्या श्री चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील एसआरएस हिंदुस्तान आणि साईराज वॉरियर्स या दोन संघांमध्ये सामना झाला. उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान किरण तरळेकर याने क्षेत्ररक्षणातील कौशल्याचे आणि अप्रतिम समय सूचकतेचे प्रदर्शन घडविताना सीमारेषेवर डोळ्याचे पारणे फेडणारा झेल टिपला. फलंदाजांने सीमारेषेबाहेर फटकाविलेला चेंडू किरण याने उंच उडी मारून हवेतच झेलला. मात्र चेंडू झेलण्याच्या प्रयत्नात आपण चेंडू हातात घेऊन सीमारेषा ओलांडणार आणि तसे झाल्यास तो षटकार ठरणार, हे लक्षात येताच किरण याने चेंडू पुन्हा हवेत फेकून सीमारेषेबाहेर जात पुन्हा तो चेंडू फुटबॉल किक प्रमाणे मैदानात लाथाडला. यावेळी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला किरण याने झेल घेण्यास सांगितले. मैदानात असलेल्या त्याच्या सहकारी क्षेत्ररक्षकाने सफाईने झेल पकडून फलंदाजाला बाद केले. किरण तळेकर याने दाखविलेले क्षेत्ररक्षणातील हा चपळपणा आणि झेल घेण्याचे कौशल्य आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे होते. त्यामुळे सोशल मीडियावर झेलाचीच चर्चा होताना दिसत आहे. किरण तरळेकर याने पकडलेल्या या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला असून किरणची सर्वत्र विशेष करून क्रिकेट प्रेमींमध्ये मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बेळगाव मधील व्हॅक्सिन डेपोवर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील ‘त्या’ अफलातून झेलाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर लिंकवर शेअर करत बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आहे. एवढेच नव्हे तर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी देखील त्या झेलाबद्दल ट्विट केल्यामुळे बेळगावचे टेनिस बॉल क्रिकेट जगप्रसिद्ध झाले आहे.
सध्या शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर श्री स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या एसआरएस संघाविरोधाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात साईराज वॉरियर्सच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर अफलातून झेल पकडला होता.
बेळगाव व्हॅक्सिन डेपो मैदानावर बेळगावच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर घेतलेला अप्रतिम झेल जगभर प्रसिद्ध झाला असून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह न्युझीलंड अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम इंगलन आणि माजी कर्णधार मायकेल वान यांनी देखील त्याची दखल घेतली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
.