loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – येवला येथे मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना चिरडले – एका युवकाचा मृत्यू

Feb 15, 2023

मंगळवारी एका मद्यधुंद वाहन चालकाने कोपरगाव ते मनमाडचे दिशेने जाताना अनेक वाहनांना धडक देत झालेल्या भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी तर एक जण ठार झाल्याची घटना येवला शहर हद्दीत घडली आहे.

तामिळनाडू पासिंग असलेल्या एका ट्रकने येवला ते मनमाडच्या दिशेने जाताना येवला शहर हद्दीत अनेक लहान मोठ्या वाहनांना धडक देत मोठा अपघात घडला आहे. या अपघातात अनेक दुचाकी चार चाकी व व्यावसायिक वाहनांची नुकसान होऊन मोठे नुकसान झाले आहेत. मद्यधुंद असलेल्या वाहन चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली असून एका युवकास आपले प्राण गमवावे लागले आहे.

रोशन मच्छिंद्र वाघमोडे (वय १९) हा या अपघातात मयत झाला असून तो आपल्या आई व नातेवाईकसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी त्याच्या सोबत त्याची आई व शेजारच्या काही महिला होत्या. लग्न काही दिवसावर येऊन ठेपल्याने धावपळ सुरु होती. त्यातच अशी घटना घडल्याने विखरणी गावावर शोककळा पसरली आहे.

ताबा सुटलेल्या ट्रकला विंचूर चौफुली येथे पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु त्याचा वेग जास्त असल्याने पोलिसांना तो आवडता आला नाही. हा ट्रक मनमाडच्या दिशेने जाऊन अंकाई बारी येथे थांबल्यानंतर पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे.

अपघात घडविणाऱ्या वाहन चालकाला अंकाई बारी परिसरात येवला शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद...

read more
.