loader image
[ays_poll id=7]

महाशिवरात्रीनिमित्त नागापुर नागेश्वर महादेव मंदिर येथे यात्रौत्सव

Feb 19, 2023


मनमाड 🙁 योगेश म्हस्के) पवित्र महाशिवरात्री निमित्ताने मनमाड येथुन जवळच असलेल्या श्री क्षेत्र नागापुर नागेश्वर महादेव मंदिर येथे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

मनमाड पासुन जवळच असलेल्या मनमाड -नांदगाव रोडवर नागापूर येथे असणारे श्री नागेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत पुरातन आणि पवित्र ठिकाण , येथील श्री नागेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत पुरातन असुन या मंदिराचा रामायण काळाशी देखील संबंध असल्याचे बोलले जाते. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि शांत असुन मंदिरा समोर भव्य सभामंडप आहे. मंदिर परिसरात अनेक देवतांची देखील मंदिरे आहे.मंदिराच्या बाजुला पुरातन असे पाण्याचे कुंड असुन त्याचे देखील खुप महत्व आहे.दरवर्षी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्री निमित्ताने येथे भव्य यात्रा भरत असते , मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली असुन , मंदिरामध्ये दर्शनासाठी शेकडो भाविक हजेरी लावत असतात , यंदाच्या वर्षी देखील श्री नागेश्वर मंदिर येथे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन , मंदिर परिसरात प्रसाद , नारळ , बेल-फुले , खेळणी , पाळणे , खाद्य पदार्थ आदी प्रकारचे दुकाने लावण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

.