loader image
[ays_poll id=7]

छत्रे विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

Feb 27, 2023


बिलंदर मन्याच्या धमाल गोष्टी सादर करून छत्रे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तसेच बाल कवी,साहित्यिक श्री संदीप देशपांडे यांनी विद्यार्थी व उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण करून मराठी अस्मिता जागृती केली,प्रसंग होता वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्म दिनाच्या कार्यक्रमाचा! येथील छत्रे विद्यालयात मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मंचावर उपस्थित संस्थेचे जेष्ठ संचालक व या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नाना कुलकर्णी यांनी आपल्या बोलण्यात शुद्ध मराठीचाच वापर करण्याचा या दिनी संकल्प करावा अशी साद घातली,पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे यांनी सुरेश भटांची छान कविता सादर केली.मुख्याध्यापक थोरात यांनी मराठी भाषेचा समृद्ध इतिहास सर्वांपुढे मांडला.या प्रसंगी पाखले व इलग सरांच्या गितमंचने महाराष्ट्र गीत सादर केले.विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कविता,नृत्य,कथाकथन,महाराष्ट्राची लोकधार या विशेष कार्यक्रमात मराठी संस्कृतीचे पैलू जसे वासुदेव,जात्यावरच्या ओव्या,शेतकरी गीत,पोतराज,जोगवा,भारुड,जागरण गोंधळ,पोवाडा,ई. कला व मराठी पारंपरिक वेशभूषा असे विविध सरस कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.मंचावर उपस्थितीत संस्थेचे सचिव दिनेश धारवडकर यांनी विद्यार्थी कलाकारांचे कौतुक केले.पर्यवेक्षिका पोतदार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अभंग सादर केला.मनोज पाटील यांनी छान गीत सादर केले,सौ.सोनवणे यांनी छान कथाकथन केले.श्री इलग व सहकारी शिक्षकांनी अतिशय छान अशी भजनं सादर केली.या प्रसंगी मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सुरेख रांगोळीचे रेखाटन व कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचे सादरीकरण निलेश जाधव यांनी केले.यावेळी मंचावर भव्य दिव्य सजावट करण्यात आली होती.सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर यांनी मराठी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या.सूत्र संचालन निलेश जाधव,संतोष कोकणे, सौ.पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री गुजर,श्री ठाकरे यांचे सहकार्य लाभले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक प्रसाद पंचवाघ यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

  मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल...

read more
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
.