loader image
[ays_poll id=7]

जिल्हा बँकेतील ठेवीदारांच्या रकमा परत मिळाव्यात – भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करणार ८ मार्च रोजी वस्त्र त्याग धरणे आंदोलन

Feb 28, 2023

मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांच्या कार्यालया समोर नाशिक येथे लोकशाही व अहिंसेच्या मार्गाने वस्त्र त्याग धरणे आंदोलन
बुधवार दिनांक 08 मार्च 2023 रोजी दुपारी 12:00 वाजता करण्यात येणार असल्याचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तर्फे पत्रकान्वये जाहीर करण्यात आले आहे. निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे
संदर्भ:- नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद वैयक्तीक ठेवीदार नागरी सहकारी पतसंस्था, पगारदार पतसंस्था, बिगर शेती पतसंस्था, सहकारी बँका यांच्या ठेवींची जमा रक्कम परत मिळणे बाबत
नाशिक जिल्हा बँकेत सन 2016 पासून बँकेचे सभासद वैयक्तीक ठेवीदार, नागरी पतसंस्था, पगारदार पतसंस्था बिगर शेती पतसंस्था, सहकारी बँका अशा बहुसंख्य ठेवीदार यांच्या ठेवी नाशिक जिल्हा बँकेत जमा असुन ठेवीदार मागेल तेव्हा गरजेनुसार त्याला त्यांची स्वताची जमा रक्कम परत देणे हे जिल्हा बँकेचे कर्तव्य व जबाबदारी असतांना बँकेचे प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकार, विभागीय अधिकारी, शाखाधिकारी, संचालक या सर्वांची जबाबदारी असतांना गेल्या सहा वर्षांपासून बँक आपली जबाबदारी व कार्य व्यवस्थित पार पाडत नसल्याने नाशिक जिल्हा बँकेचे सभासद व ठेवीदार यांनी भष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यासाकडे ठेवींची जमा रक्कम परत मिळावी या करीता विनंती केली होती.
भष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यासाने ठेवीदारांचे सर्व कागदपत्र व माहिती तपासली. तसेच नाशिक जिल्हा बँकेचे सर्व जबाबदार अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतली व सर्व ठेवीदार यांचे जमा असलेले व्याजाची व मुद्दल जमा रक्कमा परत देन्या करीता विनंती केली असता सर्व जबाबदार अधिकारी यांनी रक्कम जमा असल्याचे मान्य केले परंतु ठेवींच्या व्याजाची व मुळ जमा रक्कम परत देण्याकरीता तोंडी नकार दिला व अनेक कारणे सांगितली. तसेच ठेवीदारांना जमा रक्कम परत मिळावी या करीता दि 20/09/2022 रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाने मनमाड शाखेत एक दिवस धरणे आंदोलन केले असता जिल्हा बँकेचे नांदगाव विभागीय अधिकारी श्री दवाळे साहेब यांनी प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचने नुसार भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व मनमाड शाखेशी सलग्न सर्व ठेवीदार / संस्था यांना लेखी आश्वासन दिले कि दिनांक 01/11/2022 ते दि 31/03/2023 हा बँकेचा वसुली हंगाम असुन आम्ही थकित कर्जाची वसुली करुन ठेवीदारांना ठेवीवरील व्याजाची 100% रक्कम व ठेवींच्या मुद्दल रकमेच्या 40% जमा रक्कम सर्व ठेवीदारांना परत देण्यात येईल असे लेखी अश्वासन दिले व सुरु असलेले धरणे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली, लेखी व तोंडी अश्वासनावर विश्वास ठेऊन न्यासाने आंदोलन स्थगित केले ठेवींच्या रक्कमा देणे करीता बँकेला आवधी देन्यात आला. आज रोजी बँकेचे प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जबाबदार अधिकारी यांची भेट घेतली असता सर्व अधिकारी अनेक न पटनारी व खोटी कारणे सांगत आहे तसेच ठरल्या प्रमाणे लेखी लिहुन दिल्या प्रमाणे रक्कम देण्यास पुन्हा नकार देत आहे.

तथापी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तालुक्याच्या वतीने पुन्हा मोठ्या प्रमाणात ठेवीदार बचाव जन आंदोलन उभे करण्यात येत असुन मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांच्या कार्यालया समोर ३रा मजला गृहनिर्माण भवन राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड नाशिक येथे लोकशाही व अहिंसेच्या मार्गाने वस्त्र त्याग धरणे आंदोलन करन्यात येनार असुन ठेवीदारांना न्याय मिळावा या करीता सर्व प्रयत्न केले जानार आहेत. या बाबत योग्य ती कार्यवाही करून सहकार्य करावे हि नम्र विनंती.
भिमराज गंगाधर लोखंडे
तालुका अध्यक्ष
भास्कर विष्णु झाल्टे
तालुका सचिव
आंदोलन दिनांक:- बुधवार दिनांक 08 मार्च 2023 रोजी दुपारी 12:00 वा.

आंदोलन ठिकाण :- मा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या कार्यालया समोर गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक जुना आग्रारोड नाशिक ४२२००२.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
.