loader image
[ays_poll id=7]

सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

Mar 1, 2023


दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम दैनंदिन जीवनात दिसून येणार आहे. आजपासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. 1 मार्च म्हणजे आजपासून आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्याने त्याचा परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे. रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
मार्च महिन्यात 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मार्च महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँक सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात.

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
आरबीआयने यापूर्वी रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे एमसीएलआर दर वाढवले आहेत. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एमसीएलआरच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. आता लोकांना बँकांना ईएमआय देताना जास्त रक्कम मोजावी लागणार लागणार आहे.

ट्रेनच्या वेळेत होणार बदल
फेब्रुवारी महिना सरत असताना आता उन्हाळा सुरु झाला आहे. मार्चमध्ये रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. 5000 मालगाडी आणि प्रवाशी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी काही बदल होण्याची शक्यता आहे. सरकारने अलिकडेच आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आता भारतात नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.


अजून बातम्या वाचा..

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे...

read more
दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

नांदगाव -(सोमनाथ घोंगाने) अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने  दुष्काळ सदृष्य मंडळांना...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
.