Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी  नांदगाव चे सिद्वेश्वर ( बापु ) शिंदे यांची निवड

भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नांदगाव चे सिद्वेश्वर ( बापु ) शिंदे यांची निवड

नांदगाव सोमनाथ घोंगाणे धनगर समाज संघर्ष समिती चे प्रदेशाध्यक्ष सिध्देश्वर (बापु) शिंदे यांची भारत...

read more
मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या ७० वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या ७० वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक २...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर  शास्त्री जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी.

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]