Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने आयोजित आधार कार्ड शिबिराचा 350 लोकांनी घेतला लाभ

आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने आयोजित आधार कार्ड शिबिराचा 350 लोकांनी घेतला लाभ

नांदगावचे लोकप्रिय आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष सहकार्याने नांदगाव शहरातील लोकांसाठी...

read more
भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी  तर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत दिव्यांग बांधवांना रुग्ण उपयोगी साहित्य वाटपा सह विविध सेवा कार्यक्रमा चे आयोजन

भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी तर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत दिव्यांग बांधवांना रुग्ण उपयोगी साहित्य वाटपा सह विविध सेवा कार्यक्रमा चे आयोजन

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जन्म दिना निमित्त सध्या सेवा पंधरवडा सुरू आहे याच उपक्रमात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]