loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात जागतिक ‘महिला दिन’ उत्साहात साजरा

Mar 8, 2023

मनमाड : ( योगेश म्हस्के )दरवर्षी ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो , आपल्या समाजात असलेल्या सर्व स्त्रियांविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव,सम्मान व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा दिवस संपुर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व महिलांना आपल्या अधिकाराची जाणीव तसेच आठवण व्हावी आपले महत्त्व कळावे म्हणून दरवर्षी आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असतो , पहिला महिला दिवस हा न्युयॉर्क ह्या देशात २८ फेब्रुवारी १९०९ रोजी साजरा करण्यात आला होता पण १९१० मधील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडण्यात आलेल्या सुचनांनुसार दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जाईल असे निश्चित करण्यात आले होते. मनमाड शहरात देखील अनेक संस्था आणि संघटनाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला , मनमाड पोलीस स्टेशनमध्ये देखील आजच्या दिनानिमित्ताने पोलिस स्टेशनमधील महिला पोलिसांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती , या प्रसंगी मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रल्हाद गीते यांच्या वतीने सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील महिला पत्रकार सदस्यांचा महिला दिनानिमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने वैद्यकीय आणि पोलीस सेवेतील महिला कर्मचारी यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला , या प्रसंगी अध्यक्ष श्रीमती.नंदा गायकवाड , उपाध्यक्ष सौ.पद्मावती जाधव , सहखजिनदार सौ.भारती देवरे , प्रसिद्धी प्रमुख सौ.गीता गवळी, सचिव सौ.लता मोकळ, संघटक सौ.वैशाली वानखेडे आदी सदस्य उपस्थित होते. डायमंड सामाजिक संस्था आणि डायमंड ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून शहरातील अनेक मान्यवर आणि महिलांचा सन्मान करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
.