मनमाड :- मनमाड- चांदवड रोडवरील दरेगाव नाका येथे एका महिलेच्या गळ्यातून १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिस स्थानकात माया संतोष पगारे ( वय ३६) यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत. वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र मनमाड शहर शाखा सुरू राहणार
बँक ऑफ महाराष्ट्र जागा स्थलांतरबाबत मनमाड शहर शिवसेनेच्या निवेदनास उत्तर देत छत्रपती शिवाजी महाराज...









