राष्ट्रीय पोषण पंधरवडा यशस्वी करणार.२० मार्च ते ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत -शितल गायकवाड मुख्यसेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.
आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवुन आणण्यासाठी पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो. या अभियानांतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातुन जन आंदोलनातुन समाजामध्ये पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
२० मार्च ते ०३ एप्रिल २०२४ या कालावधीत पोषण पंधरवडा या दरम्यान श्री अन्नाचा प्रचार आणि प्रसार करुन लोकप्रिय करुन कुपोषण दुर करण्यास मौल्यवान घटक आहे या विषयी माहिती दिली जाणार आहे. स्वस्थ बालक स्पर्थेचे आयोजन केले जाणार आहेत तसेच सक्षम अंगणवाड्यांची लोकप्रियता वाढविणे अशा विविध उपक्रमाच्यां माध्यमातुन जनजागृती केली जाणार आहे…
बालविकास प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत मा.श्री.वाकडे सर प्रकल्प अधिकारी तसेच मुख्यसेविका श्रीमती सुज्ञा खरे, श्रीमती पुष्पा वाघ,श्रीमती मयुरी महिरे,श्रीमती शितल गायकवाड याच्यां सर्वाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत १०० अंगणवाडी केंद्र नाशिक,भगुर,येवला,मनमाड या सर्व विभागात पोषण पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे…
नक्कीच लोकांचा सक्रीय सहभाग नोंदवुन पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
चला तर मग “सर्वासाठी पोषण ,निरोगी भारताकडे एकत्रित वाटचाल करु या.”
सही पोषण..देश रोशन..
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर
मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...









