कोरोना काळात सोन्याचे भाव है सर्वकालीन 57000 प्रति 10 ग्राम पर्यंत पोहचले होते तेव्हाही जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याचे भाव वाढले होते त्यानंतर आजही यापुढे अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने सोन्याचे भाव या वर्षी 65000 रुपये प्रति 10 ग्राम तर चांदी 80000 रू प्रति किलो पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे मनमाड शहर सराफ सुवर्णकार असो चे सचिव दीपक गोयल यांनी सांगितले.
यात प्रामुख्याने डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर होत आहे . डॉलर च्या तुलनेत रुपया 81 वरून 83 रुपये झाला आहे . us fed reserve च्यां मते पॉलिसी रेट मध्ये 2022 च्या तुलनेत 23 मध्ये वृध्दी कमी झाल्याने सुद्धा सोन्याचे भाव वाढत आहेत तसेच रुस युक्रेन युद्धचे पडसाद , जगातील सेंट्रल बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे , पैसे गुंतवणुकीचा विश्वसनीय स्त्रोत व सध्या भारतात लगनसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे एकूणच अस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणुकीचा सोपा मार्ग म्हणून सोन्याची मागणी वाढल्याने लवकरच सोन्याचे भाव 65000 रू प्रति तोळा तर चांदी 80000 रू प्रति किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे .

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...