loader image
[ays_poll id=7]

कॉमरेड चे आठवले बलिदान… तब्बल 106 बाटली रक्त केले दान !

Mar 20, 2023


प्रतिनिधी – मनमाड येथील नॅशनल रेल्वे मजदुर युनियन या कामगार संघटने द्वारा रेल्वे दवाखाना येथे रक्तदान, नेत्रदान,कर्क रोग तपासणी सोबतच रेग्युलर हेल्थ चेक अप शिबिर भरवण्यात आले.या शिबीराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून रेल्वे कर्मचारी व त्यांच्या परिवाराकडून या शिबिराचा लाभ घेण्यात आला.
सदर शिबीर हे काही दिवसापूर्वी लासलगाव येथे झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्या दिवंगत रेल्वे कर्मचारी कॉमरेड दिनेश दराडे, कॉमरेड कृष्णा अहिरे, कॉमरेड संतोष शिरसाठ, कॉमरेड संतोष केदारे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते.काही दिवसापूर्वी रेल्वे ट्रॅक या दिवंगत समर्पित कर्मचाऱ्यांच्या रक्ताने भिजला होता त्याची आठवण ठेऊन रक्त हे रेल्वे ट्रॅक वा इतरत्र न वाहता ते गरजवंताच्या धमनी मध्ये वहावे या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
नाशिक येथील अपेक्स हेल्थकेअर हॉस्पिटल व मध्य रेल्वे चिकिस्तालय आरोग्य कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर आयोजन करण्यात आले.प्रशिक्षित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने हा आरोग्य यज्ञ यशस्वी झाला.
या शिबिरा दरम्यान अनेक मान्यवरांनी भेटी देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला तत्पूर्वी सकाळी 8 वाजता सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना मंडल चिकिस्ता अधिकारी श्री.मनीष क्षत्रिय साहेब यांनी आरोग्संपन्न जीवन जगण्यासाठी आरोग्य विषयक जनजागृती महत्वाची असून रक्तदान व विविध प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून एन आर एम यू या युनियन ने खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर मनमाड ओपन लाईन चे सचिव अंबादास निकम यांनी या आयोजना मागचा हेतू प्रस्तावनेत स्पष्ट केला.मनमाडच्या पी आय श्री बी बी थोरात साहेब,आर पी एफ निरीक्षक एस.के देसवाल,आर पी एफ चे धेंगे साहेब, डॉ. तुसे, कॉम हेमंत डोंगरे साहेब,महेश पवार,विनायक अहिरे,
डी एस ठोंबरे,आरोग्य निरीक्षक संदेश कुंदलके यांची विशेष उपस्थिती या आयोजनात होती.कारखाना शाखेचे पदाधिकारी देखील या वेळी उपस्थित होते
विविध प्रकारच्या हेल्थ चेक अप चाचणी ला महिला व पुरुष यांच्या माध्यमातून मोठा प्रतिसाद लाभला युवा चेअरमन शबरिष नायर यांच्या विशेष पुढाकाराने अनेक युवा कर्मचाऱ्यांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सदर आयोजन यशस्वी करण्यामागे सर्वश्री कॉमरेड आनंद भारसकर,सुरेश पगारे,ज्ञानेश्वर पिसे, राहुल झालटे,विशाल उगले,किरण शिंदे,नाना गरूड,विजय बारीक,उमेश खैरनार,संदीप सोनवणे,मिलिंद लिहिणार,संतोष गांगुर्डे,भूषण लाहिरे ,दुर्गेश सांगळे,रोहित सानप,निलेश गरुड सनी पाठक
सुनील ताडगे, उमेश खैरनार, सुधाकर कांडेकर, विजय गायकवाड, सुनील सांगळे, अनिल धिवसे, अरुण कुमार, श्रवण रामा, आदिनाथ चव्हाण, रवी सुरवसे, अस्लम बैग,रोहित सानप, सागर पगारे, पोपट चितणार, हितेश बोरसे, पवन भोजने, राजू वाघ, दीपक झाल्टे, सागर खंडांगळे, निलेश सोनवणे, सुभाष पालवे, बाळू बंद्रे, सागर पवार, अनिकेत झाल्टे, सारंग दराडे, अमोल झाल्टे, दशरथ राजनोर, तुषार कोल्हे, अक्षय जाधव, कैलास जाधव, विलास चव्हाण, ज्ञानेश्वर गोरे, दत्तू गुंजाळ, महेश गोरे, विकास गोरे, धर्मा झाल्टे, हर्षद शेख, सुरेश पुंजा, विकी अहिरे, प्रेम मराठे, दिनेश संसारे, अमोल पगार, नवनाथ हिंगे, समाधान शेळके, नरेंद्र हिरे, संतोष वाघ, दयानंद राजनोर, हरीश कातकडे, संभाजी वाल्मिक सपकाळे, विकास थोरात, मारोती पवार आदी कॉम्रेडस उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.