loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाडच्या वीणाताई आहेर ने स्थापित केला राष्ट्रीय विक्रम, पटकाविले सुवर्णपदक

Mar 24, 2023


बेंगलोर येथे सूरु असलेल्या चौथ्या महिला मानांकन राष्ट्रिय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई संतोष आहेर हिने क्लिन जर्क मध्ये नवीन राष्ट्रिय विक्रम स्थापित करीत सुवर्णपदक पटकावले.
५७ किलो स्नॅच व ७४ किलो क्लिन जर्क असे १३१ किलो वजन उचलून विनाताई आहेर हिने सुवर्णपदक व रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवित आपल्या सलग तिसऱ्या राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक व राष्ट्रिय विक्रम करीत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ७१ किलोचा आकांक्षा व्यवहारे चा राष्ट्रिय विक्रम मोडीत काढत ७४ किलोचा नवीन राष्ट्रिय विक्रम प्रस्थापित केला आहे तसेच १३१ किलो एकूण वजन उचलण्याच्या राष्ट्रिय विक्रमाचीही बरोबरी करीत मनमाड शहराचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रिय स्तरावर झळकावले.

 

 

 

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर,संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ पोतदार,एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन


अजून बातम्या वाचा..

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.