loader image

नाशकातील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Mar 26, 2023


नाशिक येथील उद्धव ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यात प्रामुख्याने महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा गटकळ, माजी नगरसेविका अॅड. सौ. श्यामलाताई दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, महिला आघाडी शहर समन्वयक सौ. ज्योती देवरे, माजी शिक्षण मंडळ सभापती उप महानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे, उप विभागप्रमुख कुमार पगारे, उप विभागप्रमुख पिंटू शिंदे, विधानसभा संघटक पश्चिम सौ. अनिता पाटील, उपविभाग प्रमुख आशा पाटील, शाखाप्रमुख सौ.सीमा पाटील यांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्कीच सोडवण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, सह संपर्कप्रमुख राजू आण्णा लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.