loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील प्रसिद्ध गायनाचार्य केशव जाधव यांचा अपघातात मृत्यू

Mar 27, 2023

नांदगाव- येवला रस्त्यावर रविवारी संध्याकाळी भरधाव कारने सायंकाळी चालण्यासाठी गेलेल्या दोघांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात नांदगाव चे प्रसिद्ध गायनाचार्य केशव दत्तात्रय जाधव वय (४५) हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले अतुल चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहे.नांदगाव शहरातील विवेकानंद नगर येथील प्रसिद्ध गायनाचार्य केशव महाराज जाधव व प्राथमिक शाळेचे शिक्षक अतुल चव्हाण दररोज सायंकाळी चालण्यासाठी येवला रस्त्यावर जातात. रविवारी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे चालण्यासाठी गेले होते. नांदगावच्या दिशेने येत असताना भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात केशव महाराज जागीच ठार झाले तर अतुल चव्हाण गंभीर जखमी झाले. अतुल चव्हाण यांना उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले.या अपघातात जीव गमावणारे केशव महाराज जाधव हे प्रसिद्ध गायनाचार्य असून ते मूळचे लक्ष्मीवाडीतील रहिवासी होते. विवेकानंद नगर येथे येवला नांदगाव येवला रोडवर त्यांचे रेडियम व पेंटिंगचे दुकान आहे. त्यांना परिसरात माऊली म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील व बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अपघातात बातमी येताच तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे .

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.