loader image
[ays_poll id=7]

मार्च एंड आणि २८ एप्रिल पर्यंत गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत – बाजार पेठेत शुकशुकाट

Mar 28, 2023

गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लग्नसराईला १९ मार्चपासून विवाह मुहूर्त नसल्याने, तसेच पंचांगानुसार ३१ मार्च ते २८ एप्रिलपर्यंत गुरू लोप असल्याने तब्बल दीड महिन्याचा म्हणजे ४५ दिवसांचा ब्रेक लागला आहे.

यंदाही लग्नसराईला तुळशी विवाहापासून ५ नोव्हेंबर २२ नंतर सुरवात झाली. परंतु विवाह मुहूर्त चार दिवसच होते. उर्वरित शुक्र अस्तात नऊ मुहूर्त होते. डिसेंबर २२ या महिन्यात आठ विवाह मुहूर्त होते. जानेवारी २३ मध्ये चार, फेब्रुवारीमध्ये नऊ व मार्चमध्ये पाच मुहूर्त होते. ५ नोव्हेंबर

२२ पासून ते १९ मार्च २३ पर्यंत लग्नाचा बार मोठ्या संख्येने उडविण्यात आले. विवाह मुहूर्त कमी असल्याने ग्रामीण, तसेच शहरी भागात घटिक व गोरज मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर लग्नाची धामधूम दिसून आली. मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा असल्यामुळे लग्नसमारंभांची संख्या प्रमाणातच होती. एप्रिल महिन्यात गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत. मेमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होण्याची चिन्ह दिसत आहेत. नोकरवर्ग, तसेच शेतकरीवर्गात मे महिन्याला जास्त पसंती दिली जाते. शाळा, महाविद्यालयांना या महिन्यात
सुटी असते. तसेच ग्रामीण भागात शेतकरी शेतीकामाकडे वळत असल्यामुळे जूनमध्ये कुटुंबातल्या विवाह करणाऱ्या मुला-मुलींच्या विवाहाच्या तारखा शक्यतो धरत नाहीत. तसेच पावसाळाही सुरू होतो. विड्याच्या पानापासून ते सोन्याच्या आभूषणांपर्यंत विवाहकार्यात लागणाऱ्या वस्तूंमुळे एक ते दीड महिन्याच्या काळात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल थांबण्याची शक्यता आहे. गुरू लोप असला तरी एप्रिल महिन्यात काही पंचांगानुसार १५, २३, २४, २९, ३० या दिवशी विवाह मुहूर्त दिलेले असले तरी या काळात विवाह होण्याची शक्यता कमीच असते, असे काही पुरोहितांचे म्हणणे आहे. सोयीनुसार विवाह तारखा धरल्या जातात.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.