Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

भावना गवळी यांना शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवले ; राजन विचारे यांच्याकडे जबाबदारी

भावना गवळी यांना शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवले ; राजन विचारे यांच्याकडे जबाबदारी

एकनाथ शिंदे व ५० आमदार यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतांनाच आता शिवसेना कडून...

read more
ठिणगी न्यूज इम्पॅक्ट : प्रशासनाने घेतली दखल,आठवडे बाजारातील गटारीची साफसफाई मोहीम सुरू

ठिणगी न्यूज इम्पॅक्ट : प्रशासनाने घेतली दखल,आठवडे बाजारातील गटारीची साफसफाई मोहीम सुरू

शहरातील आठवडे बाजारात काल पुन्हा गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी तसेच...

read more
केंद्रीय मंत्री डॉ सौ भारती पवार यांनी शासकीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

केंद्रीय मंत्री डॉ सौ भारती पवार यांनी शासकीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांचे उपस्थिती मध्ये मंगळवारी मनमाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]