Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदा सह आमदारकीचा राजीनामा

गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...

read more
आसाम पूरग्रस्तांना शिंदे समर्थक आमदारांकडून ५१ लाखाची मदत : एकनाथ शिंदे यांचे ट्विट

आसाम पूरग्रस्तांना शिंदे समर्थक आमदारांकडून ५१ लाखाची मदत : एकनाथ शिंदे यांचे ट्विट

आसाममधील गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांकडून आसाममधील पूरग्रस्तांना...

read more
(बघा व्हीडीओ) रॅलीला परवानगी नाकारली ; मनमाड ला उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

(बघा व्हीडीओ) रॅलीला परवानगी नाकारली ; मनमाड ला उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

सुमारे ९ दिवसांपासून राज्याच्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेनेत झालेल्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]