loader image
[ays_poll id=7]

पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Mar 29, 2023

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.
टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद...

read more
नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण...

read more
भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

दिल्ली ता. 13 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची...

read more
नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली...

read more
.