loader image

मनमाड शहर पोलीसांचे नागरिकांना आवाहन

Apr 1, 2023


🌹🌹 महत्त्वपूर्ण सुचना 🌹🌹

मनमाड शहरातील तमाम जनतेस आव्हान करण्यात येते की,शहरातील कोणीही व्यक्ती अगर नागरिकाने सोशल मिडीयावरील व्हाट्स अप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील अगर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त फोटो, व्हिडिओ, मजकूर किंवा स्टेटस ठेवू नये. कोणासही असा प्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवावे. संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र जे कोणी नागरिक अशा प्रकारचे वादग्रस्त फोटो, स्टेटस,मजकूर अगर व्हिडिओ ठेवून शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधित व्यक्ती विरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. पोलिसांचे सोशल मिडियावर बारकाईने आहे. ग्रुप चे ॲडमिन यांनी देखील आपल्या ग्रुप वर अशा प्रकारचे वादग्रस्त फोटो, व्हिडिओ अगर मजकूर टाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारचे कृत्य करताना कोणीही आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध व ग्रुप ॲडमिन यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

बाळासाहेब थोरात
पोलीस निरीक्षक
मनमाड शहर पोलीस स्टेशन


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.