loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती निवडणूक – १८ जागांसाठी १५० उमेदवारी अर्ज दाखल

Apr 4, 2023

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल सोमवारी (ता.३) अखेरच्या दिवसापर्यंत १८ जागांसाठी एकूण १५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना – भाजप आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत दिसत असली तरी माघारीच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल.

३० एप्रिल रोजी होणाऱ्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या सह माजी आमदार संजय पवार, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांच्यासह माजी सभापती आणि इतर मोठे नेते निवडणुकीत उतरले आहे.
सोमवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली होती. शिवसेना शिंद गट- भाजप युतीचे तसेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबतच अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शेतकरी देखील उमेदवारी करू शकणार असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे.

सोसायटी गटाच्या ११ जागांसाठी ८८. ग्रामपंचायत गटाच्या ४ जागांसाठी ३४, व्यापारी गटाच्या २ जागांसाठी १९ तर हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी ९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात बहुसंख्य माजी सभापती व संचालकांचा समावेश आहे.

शेवटच्या दिवसापर्यंत माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, बाळासाहेब मिसर, अप्पा कुरणगर, सतीश पाटील, प्रकाश घुगे, मंडू वडते, दीपक गोगड, गंगाधर बिडगर, देविदास उगले, सचिन दराडे, राजेंद्र वाल्मीक पवार, राजेंद्र नामदेव गिडगे, राजेंद्र सयाजी पवार, सुनील पाटील, डॉ. संजय सांगळे, किशोर लहाने, किसन बंब आदींसह इतर मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने मोठी चुरस दिसून येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.