बुधवार दि. 05 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 मनमाड विरुध्द नाशिक पी एस आय क्रिकेट अकॅडमी अं-19 या संघामध्ये महात्मा नगर नाशिक येथे झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने एक रोमांचक व चुरशीच्या सामण्यात विजय प्राप्त केला. 45 षटकांच्या या सामन्यामध्ये मनमाड संघाचा कर्णधार रुषी शर्मा याने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. मनमाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 23.3 ओव्हर मध्ये 10 विकेट गमवुन फक्त 88 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत असताना नाशिक पी एस आय संघ 82 धावांतच सर्वबाद झाला व मनमाड संघाने ह्या अत्यंत चुरशीच्या सामण्यात विजय प्राप्त केला.
गोलंदाजी करताना मनमाड संघातील चिराग निफाडकर या गोलंदाजाने 2.4 षटकात फक्त 3 धावा देत 4 बळी टिपले व या सामन्याचा सामणावीर ठरला. त्यासोबतच रूषी शर्मा याने 02 बळी तर अंशुमान सरोदेनी 01 बळी पटकवला.
मनमाड संघाच्या फलंदाजीत अंशुमान सरोदे 19 धावा सर्वाधिक धावा फटकाविल्या.
भुमी क्रिकेट अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , तय्यब शेख , कौशल शर्मा , परवेज शेख , कैलास सोनवणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन यांनी खेळाडुंना स्पर्धेतील पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.