loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयामध्ये स्किल इन्हान्समेंट कोर्सेस चे उद्घाटन

Apr 6, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी-2020 राबविण्यासाठी विविध विद्यार्थी उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी विविध प्रकारचे कोर्सेस महाविद्यालयाच्या विविध विभागांनी उपलब्ध करून दिले आहेत. शैक्षणिक वर्ष 2022 23 साठी एकूण 13 कोर्सेस महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि महाविद्यालय विकास समिती यांनी मंजूर केलेले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कोर्सेस विनामूल्य असणार आहे त्याच बरोबर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही माध्यमातून हे कोर्स उपलब्ध असणार आहेत. महाविद्यालयात या कोर्सच्या अंमलबजावणीसाठी आज दि. 5 एप्रिल 2023 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष आणि मनमाड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. हरिष आडके यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे शैक्षणिक आणि परीक्षा विभागाचे संचालक, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प यांचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. हरीष आडके यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये स्किल कोर्सेस कशाप्रकारे महत्त्वाचे आहेत यावर प्रकाश टाकला तर प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांनी विविध कोर्सेस करून आपल्या ज्ञानात भर टाकली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये त्या आधारे विद्यार्थी विविध प्रकारचे यश संपादित करू शकतात असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी महाविद्यालयात होणाऱ्या विविध कौशल्य विकास कार्यक्रमाची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमादरम्यान प्रातीनिधिक स्वरूपात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने तयार केलेल्या दोन कोर्सेसच्या आराखड्याचे सादरीकरण महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद आहिरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे, वरिष्ठ विभागातील डॉ. जे.वाय.इंगळे, डॉ.बी.एस.देसले, डॉ.आर.डी.भोसले, डॉ.जे.डी.वसईत, डॉ.एम.डी.अहिरे, डॉ.एस.एम.चिंचोले, डॉ.भामरे, प्रा.श्रीमती कविता काखन्डकी, डॉ..एस.दि.थोरे, प्रा.डब्लू.के.गागरे, प्रा.डी.व्ही.सोनवणे, त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व विभागाचे प्राध्यापक , विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

मनमाड - मनमाड येथील बी जी दरगुडे  पब्लिक स्कूलच्या शालेय परिसरात भव्य स्टेज व मंडप व्यासपीठ सजावट...

read more
वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
.