loader image

आरोग्य यंत्रणांनी सज्ज रहावे – ना. भारती पवार

Apr 7, 2023


कोविड-19 व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया जी यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याचे सुचित केले आहे.
डॉ.भारती प्रवीण पवार यांनी त्यांच्या भाषणात आरोग्य यंत्रणेने वेळेवर सज्ज राहण्याचे महत्त्व आणि कोविड-19 चे योग्य व्यवस्थापन यावर भर दिला. त्यांनी राज्य सरकारांना प्राधान्यक्रमाने आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी ईसीआरपी-II मधील कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. राज्य सरकारांनी त्यांची देखरेख यंत्रणा अधिक मजबूत करावी आणि येत्या काळात पर्यटनात वाढ होईल हे लक्षात घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना देखील डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.