loader image

कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

Apr 9, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव रेल्वे स्टेशन वर केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे आम्ही नांदगावकर या प्रवाशी संघटने कडून स्वागत करण्यात आले.

कोरोना महामारी कमी झाल्यामुळे झेलम ,कामायनी,जनता, कुशीनगर एक्स्प्रेस आदी रेल्वे गाड्यांचे थांबे पुर्ववत करण्यात यावेत ही मागणी अनेक महिन्यापासून  नांदगावकर करत होते. खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार , आम्ही नांंदगांवकर रेल्वे प्रवासी संघटनेने  मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू होता अखेर कामायनी, जनता,व कूशीनगर एक्स्प्रेसला शनिवार (दि.८ ) पासून थांबा देण्यात आला असल्याने सायंकाळी नांदगाव स्थानकावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कामायनी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

रेल्वे मंत्रालयाने कोरोना काळात अनेक गाड्यांचे थांबे रद्द केले होते.कोरोना काळापासून आजपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकावरील महानगरी, काशी, कामायनी, जनता, कुशीनगर, झेलम, शालीमार  या एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासनाने रद्दच ठेवले होते. त्यापैकी नुकतेच काशी व महानगरीचे थांबे पुर्ववत केले त्यानंतर कामायनी, जनता व कुशीनगर या गाड्यांना आजपासून थांबे देण्यात आले असून झेलम, शालीमार, सचखंड एक्स्प्रेस, पुणे भुसावळ एक्स्प्रेस या गाड्यांना थांबे देण्यात यावे आशा मागणीचे निवेदन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार यांना रेल्वे प्रवाशी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
नांदगावकरांसह तालुक्यातील व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी वर्गातर्फे  समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या थांब्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकवर जाण्यासाठी तारेवरची कसरत थांबणार आहे. आम्ही नांदगावकर कृती समितीने रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी वेळोवेळी आंदोलने निवेदने देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने जनता,कुशीनगर, कामायनी या  रेल्वे गाड्यांना थांबे दिल्याने नांदगाव रेल्वे स्थानकावरील फलाट एकवर डाऊन कामायनी  एक्स्प्रेसचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कामायनी एक्सप्रेस फुलांनी सजविण्यात आली होती. 
सायंकाळी६:५८  वाजता कामायनी एक्सप्रेसचे नांदगाव स्थानकावर आगमन झाले असता चालक व सहायक चालक यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना करण्यात आली.
रेल्वे स्थानकावर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी भुसावळ विभागाचे रेल्वे अधिकारी अनिल कुमार पाठक, डि सी.एम.जय प्रकाश मौर्य, ए. एस सी. पी .डी .वाडेकर, ए. इ एन.बी एल. मीना, वाणिज्य निरीक्षक, मीना, नांदगाव रेल्वे 
यांच्या सह अधिकारी स्टेशन प्रबंधक विश्वजित मिना भाजपाच्या जेष्ट नेत्या अँड श्रीमती जयश्री दौंड,गणेश शिंदे, दत्तराज छाजेड, संजय सानप,शहराध्यक्ष उमेश उगले,सुनील जाधव, भाऊराव निकम ,तुषार पांडे , तसेच आम्ही नांदगावकर कृती समितीच, बबलू सैय्यद,महेश जाधव,हनिफ शेख,आदीसह आम्ही नांदगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.