loader image
[ays_poll id=7]

समाजाला बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांची गरज – लोकशाहीर संभाजी भगत

Apr 19, 2023


मनमाड ता १९ : आपला देश भांडवलदारांच्या, सत्ताधिषांच्या मुठीत असून सामान्य कष्टकर्यांचे शोषण सुरू आहे. वंचित समाज आणि मजूर होरपळून निघाला आहे. अशावेळी या लोकांना ओळखून समाजाने वागायचे आहे!  समाजाला बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांची गरज आहे! बाबासाहेब येणार आहेत पण ते पुतळ्यातून येणारं नाहीत. किंवा पुन्हा जन्म घेणार नाहीत तर ते इथल्या तरुणाच्या चळवळीतून येणार असल्याचे परिवर्तनाचे विचार आपल्या शाहिरी जलशातून पहाडी आवाजात लोकशाहीर संभाजी भगत यांनी येथे मांडले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त सुरू झालेल्या भीमोत्सवाची सांगता लोकशाहीर संभाजी भगत यांच्या थेट ऑस्करला धडकलेला आंबेडकरी विद्रोही शाहिरी जलसाच्या सादरीकरणाने एकात्मता चौकात झाला. तत्पूर्वी डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भीमोत्सव आयोजन समितीचे आयोजक अमोल खरे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली. सर्वच महामानवांच्या संदर्भात होत असलेले वैचारिक प्रदूषण दूर होणे गरजेचे आहे. संकुचित वृत्तीची अडचण आणि जाती व धर्माची कुंपणे लावण्यात आल्याने महामानवांच्या विचारांना पाहिजे तसे व्यापक स्वरूप येऊ शकले नाही. त्यामुळे कुंपणे तोडून महापुरुषांच्या विचारांना व्यापक स्वरूप देण्याचे काम करण्याची गरज आहे. या जाणिवेतूनच शाहिरीतून प्रबोधनाचे कार्य करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या पहाडी आवाजात आंबेडकरी चळवळीतील महिलांचे योगदान विषद करताना ‘ माझा भीम मले सांगतो काही, मले भेटतो बाई…’ असे गीत सादर केले. महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘घ्या कळ्यांची काळजी, आले आले गारदी…’ असे प्रेरणादायी गीतही शाहीर भगत यांनी सादर केले. खास आग्रहावरुन ‘ हिटलर के साथी, जनाजो के बाराती, पुछते नही इन्सा को पुछते धर्म और जाती’ हे गीत सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘राजे जी जी जी…’ हा पोवाडा सादर केला. पण समाजासाठी काय.., ओ अक्टिंग करते भाई.., हम फॅटिंग करते भाई.., या शाहिरीसह  ते म्हणाले की, डाॅ. बाबासाहेबांचे विचार समाज बदलणारे होते हे अनेकांना माहीत नाही. जोतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. बाबासाहेबांनी शेतीवर लिखाण केले. येणारा काळ वाईट आहे, विचार मारले जातील. युद्ध विरोधी भूमिका बुद्धांनी घेतली. काही वेळात देशात धर्म उभे केले जाते. पायाभूत काम आपण केले पाहिजे, असा शाहीर संभाजी भगत यांनी शाहिरी जलशातून प्रबोधनाचा जागर मांडला. जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण असाच ठरला भीमोत्सवात पहिल्यापासूनच कार्यक्रमामध्ये आगळे वेगळे वैशिष्ट्य टाकण्यात येऊन वैचारिक, परिवर्तन आणि प्रबोधनत्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. भीमोत्सव आयोजन समितीचे आयोजक राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, संजय कटारे, डॉ जालिंदर इंगळे, निलेश वाघ, सतीश केदारे, मयूर बोरसे, राजेंद्र जाधव, संदीप नरवडे, पापा थॉमस, रामदास पगारे, मनोज ठोंबरे, भीमा महीरे, शेखर अहिरे, भास्कर कदम, अशोक परदेशी, बळवंत आव्हाड, पिंटू कटारे, दादाभाऊ शार्दुल, सचिन मुंडे, संतोष भोसले, फिरोज शेख, कदिर शेख, विक्की सुरवसे, शाहीर शरद शेजवळ, विनोद अहिरे, प्रभाकर बागुल, सुरेश अहिरे,
प्रकाश पठाडे, नरेन संसारे, राकेश कोल्हे, महेंद्र गरुड, सतीश शेकदार, संदीप देशपांडे, उपाली परदेशी, अशोक बिदरी, नाना अहिरे, योगेश म्हस्के, अफरोज अत्तार, अनिस शेख, विलास अहिरे, अनिल अहिरे, राजेंद्र पा, अर्जुन साळवे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.