loader image

मनमाड महाविद्यालयात लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Apr 24, 2023


मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेचे आधारवड लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांची ९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे व लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. अरूण पाटील यांनी लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. राजकारण, शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्याप्रमाणेच लोकनेत्यांनी या तिन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. शेतकरी, आदिवासी व दलित समाजावर लोकनेते व्यंकटराव हिरे यांचे अपार प्रेम होते त्यांनी ते कृतीतून सिद्ध केले. जिल्ह्यातील धरण, पाझर तलाव, तळी निर्माण करून कै व्यंकटराव हिरे यांनी पाणीपुरवठा योजना राबवून गावा गावातील पाणी समस्या कायमची सोडविली. धडाडी, संघटन कौशल्य, व करारीपणा हे तिन्ही गुण त्यांच्यात होते. लोकनेत्यांना सत्तेचे केंद्रीकरण पसंत नव्हते. त्यांची लोकशाहीवर निष्ठा होती. लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढणे हाच त्यांचा ध्यास होता, इत्यादी विचार त्यांनी मांडले. या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गजानन शेंडगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योती पालवे, कुलसचिव श्री समाधान केदारे, वरिष्ठ महाविद्यालयातील सुपरवायझर प्रा रोहित शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. व्ही. आर. फंड, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा.संदीप ढमाले यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
.