loader image

मनमाड करांनो पाणी जपून वापरा – महिन्यातून एकदाच होणार पाणीपुरवठा

May 1, 2023


मनमाड शहरातील तमाम नागरीकांना कळविण्यात येते की, मनमाड शहरास पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणात सद्यस्थितीत अत्यल्प पाणी साठा शिल्लक असुन वागदर्डी जलशुध्दीकरण केंद्रास अँव्हटीने 100 टक्के क्षमतेने पाणी पुरवठा होत नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात नैर्सगिकरित्या पाणी पुरवठा 15 से 17 दिवसांवर होत आहे. पालखेड धरणातून आरक्षित बिगरसिंचनाचे पाणी माहे मे मध्ये मिळणे अपेक्षित आहे. परंतू “अल-निनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे संभाव्य पावसाळा उशिरा व कमी होणार असल्याचे संकेत देऊन बिगरसिंचन आवर्तनाचे पाणी उशिरा उपलब्ध होणार असल्याने उपलब्ध पाणीसाठा माहे ऑगष्ट 2023 अखेरपर्यन्त पुरवावे असे स्पष्ट निर्देश शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा अत्यंत काटकसरीने व नियोजनबध्द वितरीत करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा शहरास तीव्र टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नगरपरिषद प्रशासनास नाईलाजास्तव शहराच्या पाण्याच्या वितरण दिवसामध्ये साधारणतः 4 ते 5 दिवसांची वाढ करावी लागत असुन माह में 2023 मध्ये साधारणतः 19 ते 21 दिवसानंतर पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. पालखेड धरणातून आवर्तनाचे पाणी उपलब्ध होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यांत येईल. नागरीकांच्या होणा-या गैरसोईबद्दल दिलगीरी व्यक्त करीत असून भविष्यात निर्माण होणा-या भिषण पाणी टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाय योजनांना नागरीकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो. तरी नागरीकानी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच प्यावे, पाण्याच्या अपव्यय करु नये, पाणी गळती वेळीच थाबवावी, याबाबत मनमाड नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगर पालिका प्रशासनाने केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.