loader image

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

May 5, 2023


नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडु साक्षी शुक्ला या खेळाडुची महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारे आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघामध्ये निवड झाली. पुणे येथे 04 मे 2023 पासुन हे सामने खेळवले जात आहेत. ज्यात साक्षी शुक्ला संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळत आहे.

या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करुन साक्षी महाराष्ट्र राज्यांच्या संघात सामील होऊन मनमाडसाठी पहिली रणजी खेळाडु होवो अशी अपेक्षा तिच्याकडून केली जात आहे.

मनमाड शहरातुन सातत्याने साक्षी जिल्हा संघासाठी खेळत आहे. तिच्या चांगल्या कामगीरीसाठी सर्वाकडुन शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कामगिरीसाठी साक्षीचे प्रशिक्षक श्री. सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांचे मार्गदर्शन तिला लाभले.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफान मोमीन व मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , गणेशभाऊ धात्रक , संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीब शेख , तय्यब शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज शेख , कौशल शर्मा , सनी फसाटे , परेश राऊत
तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे साक्षी शुक्ला हिचे अभिनंदन करुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.