loader image
[ays_poll id=7]

अनकवाडे शिवारातील पुलाचे कठडे तोडून ट्रक खाली कोसळला – चालक जखमी

May 8, 2023

इंदौर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड नजीक असलेल्या मनमाडकडे येणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनकवाडे शिवारात असलेल्या रेल्वे पुलाचे कथडे तोडून पुलाखाली असलेल्या मनमाड – पुणे लोहमार्गानजिक गाडी कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून चालकाला किरकोळ मार लागला आहे. चालकास मनमाड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नगरसुलहून मनमाड कडे येत असताना अनकवाडे शिवारात असलेल्या पुलावर ट्रक गाडी क्रं. एमएच १५ जी ४९४३ वरील चालक गुलाब देवरे वय – ४५ रा. उमराणा ता. देवळा याचे समोरून येणाऱ्या गाडीने कट मारल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले.यामुळे पुलचे कथडे तोडून जवळपास ३० फुट गाडी पुलाखाली असणाऱ्या मनमाड – अहमदनगर लोहमार्गानजिक कोसळली. सुदैवाने लोहमार्गाच्या ७-८ फुट लांब गाडी कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी, लोहमार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.