मनमाड – कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही गाडी पूर्ववत नियमीत सुरू करण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मागणीला रेल्वे विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मनमाड कुर्ला टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस कायमस्वरूपी नियमित सुरू करावी तसेच मनमाड-इंदौर महामार्गावरील मनमाड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजची कालमर्यादा समाप्त झाली असल्याने त्याची नवीन निर्मिती करावी, अशी मागणी आमदार सुहास
अण्णा कांदे यांनी १० फेब्रुवारी २३ रोजी मंडळ रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे भुसावळ मंडळ व मंडळ रेल्वे प्रबंधक सेंट्रल रेल्वे भुसावळ सर्कल यांना लेखी स्वरूपात मागणी करण्यात आली होती. या दोन्ही मागण्यांचे उत्तर आ. कांदे यांना पत्राद्वारे प्राप्त झाले असून अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक भुसावळ सुनील कुमार सुमन यांनी दिलेल्या पत्रात गोदा वरी एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्या चा निर्णय हा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकारात येत असल्याने आपल्या
सूचना मुख्यालयास पाठवीत असल्याचे नमूद केले आहे. तसेच रेल्वे ओव्हर ब्रिज निर्मिती संबंधित कार्य पीडब्ल्यूडी नासिक यांच्याशी संबंधित असून दि. ३११५/२०१९ रोजी पीडब्ल्यूडी सोबत झालेल्या बैठकीनुसार आव्हरब्रिज निर्माण कार्य पीडब्ल्यूडीद्वारा करण्याचे निश्चित झाले असून त्यांच्याशी यानंतर पीडब्ल्यूडी यांना ओव्हरब्रिज निर्मितीबाबत दि. १५/२/२०२३ आणि १४।३।२०२३ रोजी स्मरणपत्र देण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.