loader image

मनमाड करंजवण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू – नियोजित वेळेत काम पूर्ण करून मनमाड वासियांना दररोज मिळणार पाणी

May 14, 2023


करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू असून
करंजवण धरणाच्या कडेला जॅकवेलचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
मनमाड शहरात गेल्या ४० वर्षांपासून असलेली पाणीटंचाई सोडविणारी व शहरासाठी महत्व- पूर्ण असलेल्या ३११ कोटी रूपये खर्चाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी योजने चे काम करंजवण धरण ते मनमाड जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत युद्धपातळीवर सुरू आहे.

आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या मनमाड-करंजवण पाईपलाईन कामाची पाहणी मनमाड शहरातील पत्रकारांनी केली. यावेळी मनमाड- लासलगांव रोडवरील भारत नगर जवळील सुरू असलेले जलशुद्धीकरण केंद्राचे व पाण्याच्या टाकीचे काम, मनमाड ते करंजवण सुरू असलेले पाईपलाईनचे काम व करंजवण धरणा जवळ सुरू असलेल्या जॅकवेलच्या कामाची पाहणी करीत माहिती घेतली.

मनमाड-लासलगांव रोडजवळील भारत नगर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे व पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर सुरू असून येथील २ कोटी ७५ लाख लिटर क्षमतेच्या या जलशुध्दीकरण केंद्रात पाणी शुद्ध होऊन ३५ लाख लिटर क्षमतेच्या साठवण केंद्रात पाणी साठवून शहरातील १२ पाण्याच्या टाक्याद्वारे शहराला १३५ लिटर प्रति मानसी पाणीपुरवठा केला जाणार आहे. हा पाणीपुरवठा शहरा- तील १२ टाक्या व नवीन तीन टाक्या बनवून एकूण १५ टाक्यांद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

भारत नगर, रायपूर, निंबाळे, गंगावे, विटावे, सोनी सांगवी, काजी सांगवी, पाटे, कोलटेक, हिरापूर, देवरगांव खड़क ओझर, नांदुरखुर्द, वावी, गोरठाण, शिरवाड फाटा, वडनेर भैरव, वडाळी भोई, खेडगांव, बोयेगांव, राजाराम नगर, अंबेवणीगांव, परमोरी, लखमापूर, करंजवण गाव,
अशा रस्त्याच्या कडेने सुरू असलेल्या ही योजना काय आहे व योजनेच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून या रस्त्याने सुमारे ३० किमीचे काम पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी चारी खोदून जलवाहिनी टाकली जात आहे. करंजवण धरणात कडेला जॅकवेलचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ही संपूर्ण पाईपलाईन कॉम्प्युटराईज फायबर ऑप्टिकलद्वारे नियंत्रीत असून यामुळे लिकेज झाल्यास लगेच समजणार आहे.

कामाची सद्य परिस्तिथी बघण्यासाठी शहरातील नागरिकांसाठी आमदार संपर्क कार्यालयातून बससेवा उपलब्ध करण्यात येत आहे. या योजनेबद्दल ज्यांना माहिती घ्यायची असेल, त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन आ. कांदे यांनी केले आहे. धरणात पाणी साठा असल्यामुळे भरलेल्या पाण्याचा उपसा करून काम करावे लागत आहे. सदर काम लवकरच पूर्ण होईल असे मत युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी यावेळी व्यक्त केले. या योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या नेतृत्वाखाली सर्व मनमाड शहरातील पत्रकारांचा समावेश होता. यावेळी लाला नागरे, निलेश व्यवहारे, सचिन दरगुडे आनंद दरगुडे, मयूर गोसावी, कुणाल विसापूरकर, जीवन भाबड
मनमाड शहराचा पाणीप्रश्न पाहता करंजवन धरणातून थेट मनमाड भारत- नगर जवळील जलशुध्दीकर केंद्रात पाणी घेण्याच्या करंजवन जलवाहिनी योजना ही अत्यंत महत्वाची योजना आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून साकार झाली. मनमाड ते करंजवण दरम्यान ठिकठिकाणी पाईपलाईनचे काम ३० किमी पूर्ण झाले असून वर्षभरात ही योजना पूर्ण होऊन मनमाडला रोज पाणी मिळेल असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.