loader image
[ays_poll id=7]

शिवसेनेचे महावितरण कार्यालयात “कंदील जलाव” आंदोलन

May 17, 2023

गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित भारनियमन सुरू असून, सातत्याने वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले असून मंगळवारी मनमाड शहर शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात ‘कंदील जलाव’ आंदोलन करण्यात आले. कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवर कंदील आणि मेणबत्ती लावून व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन या वेळी देण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा वीजग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष बळीद यांच्या नेतृत्वाखाली सहसंपर्कप्रमुख प्रविण नाईक, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, जिल्हा संघटक संजय कटारीया, तालुका संघटक संतोष जगताप, शहरप्रमुख माधव शेलार, तालुका उपप्रमुख अशोक पदमर आदी उपविभागीय कार्यालयात गेले असता कार्यकारी अभियंता अनुपस्थित होते. त्यांच्या टेबलवर कंदील आणि मेणबत्ती पेटवून निषेध नोंदवत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, त्यात म्हटले आहे, की अनेक भागांत आठ तास वीजपुरवठा खंडीत होत आहे. अर्बन-२ मध्ये केव्हाही वीजपुरवठा खंडीत होतो. अधिकारी, लाईनमन वायरमन यांचे फोन बंद असतात. भोंगळ कारभारामुळे माहिती मिळत नाही. बील भरण्यास विलंब झाल्यास लगेच वीजपुरवठा खंडितकेला जातो. बिले कमी करण्यासाठी चकरा माराव्या लागतात. मीटर रिडींग न घेता भरमसाठ बिले दिली जातात. कोटेशन भरुनही वीज मीटरदिले जात नाही. अनेक वायरमन कर्मचाऱ्यांनी वीज बिलाचे रोख पैसे घेतले. मात्र, अद्याप विल भरले नाही, तांत्रिक अडचणींच्या नावाखाली अघोषित भारनियमन होत असल्यास तसे कळविणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करावे लागेल, असा इशारा श्री. बळीद यांनी दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.